विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीसांचे पथसंचलन

वैभववाडी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस ठाण्यामार्फत वैभववाडी शहर, उंबर्डे व कोळपे येथे संचालन करण्यात आले. सीआयएसएफ तुकडी, स्थानिक व तालुक्याबाहेरील असे एकूण 84 पोलीस सहभागी झाले होते.

विधानसभा निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्यावतीने रूट मार्च चे आयोजन करण्यात येते. या निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीस अलर्ट मोड वार आले आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवारी वैभववाडी शहरात रूट मार्च करण्यात आला.

यात वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील अवसरमोल, देवगड पोलीस निरीक्षक श्री. यशवंते, कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, सीआयएसएफ चे अधिकारी श्री.अशुभमल सीआयएसएफ चे 50 कर्मचारी तसेच वैभववाडी पोलीस ठाण्याचे तसेच अन्या तालुक्यातील 34 पोलीस कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.शहरातील रूट मार्च नंतर सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उंबर्डे तसेच कोळपे येथेही रूट मार्च घेण्यात आला.

error: Content is protected !!