कळसुलीतील तो पक्षप्रवेश फसवा ; सरपंचांचा स्वतःच्या चुका लपविण्यासाठी आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न – शाखाप्रमुख बाळा नाईक

त्या कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेशी काही संबंध नव्हता

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली येथील कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलेला प्रवेश हा आपल्याच कार्यकर्त्यांना शाल घालून केलेला आहे.आमदारांना खुश करण्यासाठी आणी त्यांची वाह…वाह…मिळवण्यासाठी तसेच स्वतःच्या काही चुका लपवण्यासाठी कळसुली सरपंच सचिन पारधीये यांनी तो पक्ष प्रवेश आमदारांची दिशाभूल करण्यासाठी केलेला आहे.मुळात ते उबाठा सेनेचे कार्यकर्तेच नव्हते. फोटोत असलेले कार्यकर्ते हे भाजपचेच कार्यकर्ते होते. त्यामुळे प्रवेश केलेल्या एकही व्यक्तीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे शाखाप्रमुख बाळा नाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तसेच आपल्याच कार्यकर्त्यांना शाल घालू पक्ष प्रवेश दाखवण्याची वेळ ही कळसुली सरपंचांवर आलेली ही लाजिरवाणी गोष्ट आहे,असा उपरोधी टोला देखील श्री. नाईक यांनी कळसुली सरपंचांवर हाणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!