भाजप युवा मोर्चा कणकवली शहर कार्यकारणी जाहीर

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात विकास कामांची गंगा वाहत आहे.गेल्या १० वर्षात शहराचा त्यांनी आमदार म्हणून विकास केलेला आहे. सर्व विकासकामे शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कणकवलीतील युवकची आहे.शहरात प्रत्येक युवकांना सोबत घेऊन युवामोर्चाने आमदारांनी केलेलीं काम प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या मोर्चाच्या माध्यमातून होईल,असे युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे यांनी या बैठकीत सांगितले.

कणकवली शहर युवा मोर्चा कार्यकारणी स्वप्नील शशिकांत राणे – उपाध्यक्ष, ऋषिकेश रमेश परब – सरसिटणीस, ओंकार सुतार चिटणीस, सिध्देश प्रकाश वालावलकर – चिटणीस, ऋतिक नलावडे – चिटणीस, अवधूत मोहन तळगावकर चिटणीस, निलेश प्रकाश वाळके कार्यकारणी सदस्य, कुणाल राणे – कार्यकारणी सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख सुशांत सावंत, ओंकार राणे, योगेश जाधव, बुध अध्यक्ष 287- विनय दिलीप साटम , 288 – प्रज्ञेश जयेंद्र निग्रे, 289 संदेश दशरथ आडेकर , 290 – गौतम धर्मचंद्र हिदळेकर, 291- ओंकार वाळवे, 295 – समर्थ कोळंबकर, 296 महेश नंदकिशोर डिचोलकर, 297 चिराग वशिवडेकर आदी पदाधिका- यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , माजी नगरसेवक अभय राणे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू ) पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर , तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!