शिवसेना नेते डॉ. निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होणार; आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांचा विश्वास

शिवसेना आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी नेते डॉ. निलेश राणे यांची घेतली भेट

आचरा (प्रतिनिधी) : माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांचे आचरा विभाग तथा आचरा जिल्हा परीषद मतदार संघाच्या वतीने स्वागत केले आहे. डॉ. निलेश राणेच्या प्रवेशाचे आचरा मतदार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत आचरा जिल्हा परिषद मतदार संघाचे सर्वाधिक जास्त लीड असेल यात कोणतीही तीळमात्र शंका नाही असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. सूज्ञ मतदार तसेच महिला व युवा मतदार हे राणे साहेबांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहणार असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यात आचरा मतदार संघ पहिल्या क्रमांकावर असेल असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर म्हणाले की विरोधक हे सध्या शासनाच्या अनेक योजना किंवा लाडकी बहिण योजना याचा अपप्रचार करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. विरोधक विकासाच्या मुद्यावर न बोलता मतदारांचे मन वळवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर टिका करताना दिसत आहेत. त्याचा शिवसेना नेते डॉ. निलेश राणे यांच्या विजयावर कोणताही परिणाम आचरा मतदार सघांतून नक्कीच होणार नाही याची सर्व जबाबदारी प्रत्येक सूज्ञ मतदार घेतील व हक्काच्या शिवसेनेच्या कुडाळ मालवण मतदार संघावर राणे साहेबांच्या रूपाने धनुष्यबाण निशाणीचा भगवा फडकेल असा विश्वास पळसंबचे माजी सरपंच व शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!