राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

यादीत आमदार सतेज पाटील यांचा समावेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेसाठी त्याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार. या निवडणुकांसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षान आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाला, तसंच राज्य निवडणूक आयोगाला सादर केलीय. या यादीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, कन्हैया कुमार यांच्यासह आमदार सतेज पाटील यांचा समावेश आहे. आमदार सतेज पाटील यांच्यासह या यादीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रणिती शिंदे, खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार भाई जगताप, आमदार विश्वजीत कदम या राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!