ऐन दिवाळी सणात वीज पुरवठा खंडित
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस विजेचा लपंडावं सुरु आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणात तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.शुक्रवारी लक्ष्मी पूजनही अंधारात करण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेले दोन दिवस तालुक्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गुरुवार सायंकाळपासून तालुक्यातील अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर शुक्रवारीही सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना लक्ष्मी पूजनही अंधारात करण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.











