भंपक आणि बोगस वक्तव्य करून कणकवलीची प्रतिमा मलिन करू नका

संदेश पारकर यांना माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा सल्ला

पारकर पांढरे कपडे घालून आले,त्यांनी पाहिले आणि ते निघून गेले योगदान काय शून्य..!

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्तांचे सांत्वन करा, टीका करून भंपक गिरी करू नका

कणकवली (प्रतिनिधी) : बेकरीला लागलेली आग आणि त्या आगीने नुकसान झालेल्या व्यापारांचे सांत्वन करण्यापेक्षा उबाठा चे संदेश पारकर अशा दुःखद प्रसंगात सुद्धा राजकारण करतात हे दुर्दैव आहे. कणकवली नगरपंचायतीचा अग्निशमन बंब हा सर्वात उत्तम आडवांस टेक्नॉलॉजी असलेला बंब आहे. समीर नलावडे नगराध्यक्ष असताना आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि प्रयत्न तून हा बंब कणकवली साठी मिळाला आहे. रात्री आगीची दुर्घटना घडल्यानंतर आगीचे रौद्ररूप याच बंबाने आटोक्यात आणले आणि नजीकच्या भाजी मार्केटमध्ये व जवळच्या घरांना लागणारी आग रोखण्यात आली. हे सर्व होत असताना संदेश पारकर हे पांढरे कपडे घालून आले त्यांनी पाहिलं आणि ते निघून गेले. आणि टीका केली त्यांनी अशी भंपक गिरी आजपर्यंत कणकवलीतच ते करत आलेले आहेत. किमान देवगड वैभववाडी त जाऊन अशा वृत्ती चे प्रदर्शन करू नका. भंपक आणि बोगस वक्तव्य करून कणकवलीची प्रतिमा मलिंग करू नका असा सल्ला कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला.

पहाटेची सुमारास अर.बी. बेकरी ला शॉर्टसर्किटने आग लागल्यानंतर याबाबतची माहिती राजू गवाणकर यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना दिली. आमचे भाजपचे कार्यकर्ते आणि बाजारपेठेतील व्यापारी वेगवेगळे समाजातील घटक असे सर्वांनी मिळून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हे काम सुरू असतानाच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सावधानता म्हणून कुडाळ एमआयडीसी, कुडाळ नगरपंचायत, मालवण नगरपंचायतीचा बंब सुद्धा मागवला होता ते येईपर्यंत आमच्या कणकवली नगरपंचायत च्या बंबांकडून ही आग विझवण्यात आलेली होती. एवढं सर्व होत असताना संदेश पारकर स्वतः या गोष्टी त सहभागी न होता. आग विझविण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता किंवा ज्यांचे नुकसान झाले त्यांचे सांत्वन न करता. नुसते राजकारण करायचे चुकीच्या पद्धतीने आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरपंचायत प्रशासनावर टीका करायची हे शोभनिय नाही. प्रसंग काय आहे याची जाणीव न ठेवता जी भंपकिरी संदेश पारकर यांनी केलेली आहे ती पूर्णतः निषेधार्य आहे. उमेदवार म्हणून आपण काय बोलावं याचे भान त्यांनी ठेवावे आणि कणकवलीत अशी भंपकगिरी नेहमीच करतात ती देवगड आणि वैभववाडी च्या लोकांना दाखवून कणकवलीची प्रतिमा मलिन करू नका असा सल्ला बंडू हर्णे यांनी दिला आहे

error: Content is protected !!