चिंदर येथील सुंदरा पारकर यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भटवाडी येथील रहिवासी सुंदरा हरी पारकर यांचे शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 84 वर्षाच्या होत्या. मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून त्या सुपरीची होत्या. चिंदर पालकरवाडी-भटवाडी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. संदीपभाई पारकर यांच्या त्या मातोश्री तर युवा उद्योजक निशांत पारकर, रोहन कोदे यांच्या त्या आजी होत. त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!