कुणकेश्वर रापण महोत्सवाचे शानदार उदघाटन
देवगड (प्रतिनिधी) : राज्यात पर्यटनाच्या माध्यमातुन गोवा राज्य हे जगाच्या नकाशावर झळकले आहे.आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याची ताकद पर्यटन व्यवसायात आहे.मत्स्यव्यवसायातील पारंपारिक संस्कृती व पारंपारिक व्यवसाय लोकांसमोर आणण्याचे काम रापण महोत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे हे कौतुकास्पद असून असेच महोत्सव विविध क्षेत्राद्वारे आयोजित करून आपली संस्कृती व पारंपारिकता टिकवून ठेवली पाहिजे असे मत उद्योजक प्रकाश गायकवाड यांनी व्यक्त केले.दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या कुणकेश्वर पर्यटनस्थळी असे महोत्सव आयोजित करून पर्यटनाचे दालन खुले केले आहे असेही गायकवाड यांनी सांगीतले.
पारंपारिक रापण महोत्सव कुणकेश्वर कातवण, कुणकेश्वर देवस्थान टड्ढस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर कातवण, कुणकेश्वर विकास सोसायटी व देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर समुद्रकिनारी आयोजित केलेल्या रापण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक प्रकाश गायकवाड, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, भजनी बुवा प्रकाश पारकर, विलास ऐनापुरे,सरपंच महेश ताम्हणकर, प्रशांत qशदे, नरेश डामरी, प्रमोद आंबेरकर, विनायक जोईल, चंद्रकांत घाडी,अरqवद वाळके, रामदास तेजम, दिग्विजय कोळंबकर, संतोष लब्दे, प्रमोद नलावडे, संजय वाळके आदी उपस्थित होते.
प्रकाश गायकवाड म्हणाले, देवगडमध्ये अनेक निसर्गसौंदर्य पर्यटनस्थळे आहेत.यामुळे देवगडमध्ये गेल्या काही वर्षात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.देवगड तालुक्यातील महत्वाच्या बीचवर यापुर्वीही पर्यटनाला चालना देणाèया महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे अशाप्रकारेच कुणकेश्वर समुद्रकिनारही गेल्या वर्षीपासुन रापण महोत्सव ही महोत्सवाची अनोखी संकल्पना राबविली गेली व त्याला पर्यटकांनीही उत्स्\ुर्त प्रतिसाद दिला होता.यावेळचा रापण महोत्सव हा मत्स्य पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही प्राधान्य देणारा असून कृषी प्रदर्शनाचा समावेश या महोत्सवात केल्यामुळे कृषी पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.रापण महोत्सवामध्ये विविध प्रकारचे खाद्य स्टॉल व कृषी स्टॉल उभारण्यात आले असून कृषी साहित्यांची माहिती व खरेदी करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच गर्दी दिसून येत आहे याचबरोबर विविध प्रकारच्या दर्जेदार मासळीचा आस्वाद घेण्यासाठी या महोत्सवाला विविध भागातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.चार दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच मत्स्य व कृषी प्रदर्शन, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, समुद्रातील विविध प्रकारच्या ताज्या मासळीची रेसिपी व कोकणी जेवणाची मेजवानी आदींचा आस्वाद घेता येणार आहे.हा महोत्सव पर्यटनाला चालना देणारा ठरेल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.