कणकवली (प्रतिनिधी) : 268 कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंदीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचाना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कणकवली शहरात नगरपंचायत तर्फे मोटर सायकल रॅली आयोजित करण्यात आली.सदर रॅली कणकवली नगरपंचायत मार्गे पटकी देवी मंदिर ते पटवर्धन चौक कडून हायवे मार्गे रेल्वे स्थानक ते कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे समाप्त करण्यात आली. सदर रॅली मद्दे कणकवली शहरातील नागरिक तसेच कणकवली नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये दि.24/10/2024 पासून मतदान शपथ,पथ नाट्य, मतदान जनजागृती रॅली हे उपक्रम, तसेच मतदार सेल्फी पॉईंट व मतदार हस्ताक्षर अभियान शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत.सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी,नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.











