अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांच्या दाव्याने खळबळ
अंदर की बात संदेश पारकर नितेश राणे एकसाथ म्हणत निर्माण केला ट्विस्ट
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेतील अपक्ष उमेदवार नवाज खणी यांनी शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश पारकर यांच्या फॅमिली चे सारस्वत बँकेचे कर्ज भाजपा आमदार नितेश राणे यांनी फेडल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. अंदर की बात संदेश पारकर नितेश राणे एकसाथ म्हणत नवाज खणी यांनी कणकवली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर वेगळाच ट्विस्ट निर्माण केला आहे. नवाज खणी म्हणाले की सारस्वत बँकेचे संदेश पारकर यांच्या फॅमिली चे 1 कोटी 30 लाखांचे कर्ज होते.जे कर्ज विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी दाखल करण्याआधी पारकर यांनी परतफेड केले. संदेश पारकर यांचे कुठले व्यवसाय आहेत की त्यांनी 1 कोटी 30 लाख कर्ज रक्कम परतफेड केली ? संदेश पारकर याना सारस्वत बँकेच्या कर्जफेडीसाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी पैसे दिल्याचा दावा अपक्ष उमेदवार नवाज यांनी केला. तसे नसेल तर पारकर यांनी माझे म्हणणे खोडून काढत खुलासा करावा की कर्जफेडीसाठी पैसे कुठून आणले ? अन्यथा 15 नोव्हेंबर रोजी पुरावेच सादर करेन असा इशाराही नवाज यांनी दिला. संदेश पारकर हा नितेश राणेंचा माणूस आहे. नितेश राणेंनीच संदेश पारकर याना विधानसभा निवडणुकीत उभे केले आहे. संदेश पारकर ना मत म्हणजे नितेश राणेंना मत हे मुस्लिम बांधवांनी समजून घेतले पाहिजे. मुस्लिम द्वेष्ट्या लाडका आमदार नितेश राणे आणि सेटलमेंट वाले संदेश पारकर यांच्यापासून मुस्लिम समाजाने सावध राहावे असेही अपक्ष उमेदवार नवाज खणी म्हणाले.