कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथे संदेश भाई पारकर यांच्या प्रचारार्थ बेठक संपन्न झाली..ज्यांना आपण मंत्री केलं जना मुख्यमंत्री केलं त्यांना राज्यसभेचा खासदार केलं ज्याला केंद्राचे उद्योग मंत्री केलं त्या 35 वर्षांमध्ये ज्या भोळ्या भावड्या जनतेने माझ्या विश्वास ठेवला की नेतृत्व कुठेतरी माझ्या जिल्ह्याचा विकास करेल या माझ्या हरकुल चा विकास करेल त्या माझ्या मतदारसंघाचा विकास करेल म्हणून 35 वर्ष या जिल्ह्यातील यांच्या प्रॉपर्टीत वाढ झाली हे श्रीमंत झाले ..पण ज्या जनतेने यांच्यावर विश्वास ठेवला ते आजही गरिबीमध्ये आहे आणि मग आपली जबाबदारी कुठेतरी आपला हा जो स्वाभिमान आहे हा स्वाभिमान दाखवण्याची वेळ आली आणि म्हणून आपण परिवर्तन केलं पाहिजे जे लोक चुकीचे लोक गेले 35 वर्ष या सत्तेच्या सगळ्या पदांवर त्यांनी या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या गावातल्या जनतेसाठी काही केलेलं नाही आणि म्हणून कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे तुमच्या मनातल्या जे प्रश्न आहे तुमच्या मनातल्या ज्या वेदना आहेत तुमच्या मनातल्या समस्या आहेत या समस्याच नेतृत्व करणारं कोणतरी एक संदेश पारकर सारख मात्र नेतृत्व आहे यांच्या मागे राहण्याचं निश्चय करण्यात आला… त्यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष प्रथमेश सावंत, सरपंच बंडू ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, फय्याज खान, नित्यानंद चिंदरकर, नासिर खान, जयबा कुरेशी, कमलेश नारकर, दिवाकर पारकर मोठ्या प्रमाणात हरकुळ बुद्रुक येथील नागरिक उपस्थित होते..