गतिमान विकास आणि जनहिताच्या योजना सुरूच राहणार
आंबेरी गावात खा. नारायण राणे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
मालवण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रातही महायुती सरकार गतिमान विकास आणि जनहिताच्या योजना यांना प्राधान्य देत आहे. हे जनतेचे सरकार पुन्हा विजयी होईल. कुडाळ मालवण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनाही जनतेचा मिळत असलेला मोठा पाठिंबा पाहता ते बहुमतांनी विजयी होतील. असा ठाम विश्वास खा. नारायण राणे यांनी आंबेरी येथे बोलताना व्यक्त केला.
यावेळी विरोधकांचा समाचारही त्यांनी घेतला. बाहेरील ठेकेदार यांना हाताशी धरून मागील दहा वर्षात येथील आमदाराने रस्ते केले. मोठा भ्रष्टाचार झाला त्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अश्या ठेकेदारांवर कारवाई होईल त्या बरोबर सर्व रस्ते आगामी काळात योग्य दर्जाचे बनवले जातील. ग्रामस्थांना अपेक्षित विकास साध्य केला जाईल. असे खा. नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव भेट दौऱ्यात खा. नारायण राणे यांनी आंबेरी गावात भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मनोज डिचोलकर यांनी खा. नारायण राणे यांचा स्वागत सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांनी मोठया उत्साहात त्यांचे स्वागत केले. आंबेरी गावावर राणे साहेबांचे विशेष प्रेम नेहमीच राहिले. अनेक विकासकामे त्यांच्या माध्यमातून झाली असून यापुढेही होणार आहेत. मागील काही वर्षात निलेश राणे यांनीही सातत्याने मतदारसंघातील गावे, वाडी वस्तीवर विशेष लक्ष दिले. सरकारच्या माध्यमातून मोठा विकासनिधी प्राप्त करून देण्यात त्यांची भुमिका महत्वाची ठरली. विकासाचा दृष्टिकोन व व्हिजन असणारे नेतृत्व निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य देणार, असा निर्धार यावेळी उपस्थितानी व्यक्त केला. यावेळी भाजपा जिप मतदारसंघ प्रभारी सतीश वाईरकर, भाजपा ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, युवासेना पदाधिकारी प्रितम गावडे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, आशिष हडकर यांसह सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रविंद्र परब, सदस्य गणेश डिचोलकर, कमलेश वाक्कर, रुंदा केळुसकर, पूर्वा मुसळे, मीनल सामंत, सुचिता कांबळी, पंचायत समिती माजी सदस्या श्रद्धा केळुसकर, बूथ अध्यक्ष निलेश मुसळे तसेच समिर मांजरेकर, अमित डिचोलकर, शंकर खोत, बाबल वाक्कर, सुशांत वाक्कर, योगेश वाक्कर, शेखर वाक्कर, निखिल वाक्कर, समिर मुणगेकर, महेश पाटणकर, बबन वाक्कर, अमोल वाक्कर, न्यानदेव कोजरेकर, यश खोत, शरद केळुसकर, रवी सामंत, रवींद्र कांबळी, दाजी राऊत, सागर राऊत, संतोष सातारडेकर, जयेश तावडे, तातू डिचोलकर, विनोद गोसावी, रमेश पाटकर, शेखर आंबेरकर, राजन आंबेरकर, अभय केळुसकर, आनंद केळुसकर, प्रसाद परुळेकर, नारायण वाक्कर, प्रवीण वाक्कर, महेश डिचोलकर, पिंट्या परुळेकर, संदेश मांजरेकर, सुहास राऊत, सूर्या राऊत, महेंद्र सामंत, तातू नांदोसकर, सिद्धेश कोजरेकर, संजय कुलकर्णी, हितेश आंबेरकर, दिनेश मुसळे, सुरेश मुसळे, बाळू मुसळे तसेच अन्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.