वराड, काळसे गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांशी साधला संवाद
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांनी व्यक्त केला निर्धार
मालवण (प्रतिनिधी) : कोकणची जनता मी माझे कुटुंब मानतो. प्रत्येक गावाशी माझे आपुलकीचे नाते आहे. येथील जनतेचा सर्वांगीण विकास हेच माझे लक्ष आहे. जिल्ह्यात विकासाची क्रांती घडवायची आहे. खासदार निधी बरोबरच केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणणारच. सोबत मोठया मताधिक्याने विजयी होणारे आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर या सर्वांच्या एकत्रित सहभागातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकासातून कायापालट करणार. असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
विकासाच्या विविध संकल्पनाही त्यांनी ग्रामस्थासमोर मांडल्या. सोबतच विरोधकांच्या अपयशी कारभारावरही निशाणा साधला. हा मतदारसंघ विकासात मागे गेला. मात्र यापुढे विकासाची गती निलेश राणे यांच्या माध्यमातून कितीतरी अधिक वेगाने सुरु राहील. असेही खा. राणे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने खा. नारायण राणे यांनी वराड, काळसे गावांना सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे प्रचंड बहुमताने विजयी होतील. हा विश्वास जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून यावेळी दिसून आला.
खा. नारायण राणे यांनी वराड गावात भेट देत श्री देव वेताळ देवालयात दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख राजन माणगांवकर, जिल्हापरिषद प्रभारी सतीश वाईरकर, युवामोर्चा पदाधिकारी आशिष हडकर, बबन पांचाळ, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, अशोक परब, भाई परब, ऍड. प्रदीप मिठबावकर, बुथ कमिटी अध्यक्ष हनुमंत सरमळकर, अजय चव्हाण, बाळा मसुरकर यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. तर काळसे येथे माजी सभापती राजेंद्र परब, सरपंच विशाखा काळसेकर, नंदू नातू, अमृत नार्वेकर, विपुल मळगावकर, शामसुंदर प्रभू, कमलाकांत आजगावकर, सुमन गोसावी, सिद्धेश माळगांवकर, सतीश वाईरकर, आशिष हडकर, भाजपा महिला पदाधिकारी पुजा वेरलकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, भाई मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.
वराड सोनवडे या बहूप्रतीक्षित पुलाचे काम मार्गी लागत आहे. पूल पुर्ण होत आहे. यां पुलाचे श्रेय खा. नारायण राणे यांचेच असल्याचे राजन माणगावकर यांनी सांगितले. तर वराड गाव नेहमीच राणे साहेबांच्या पाठीशी राहिला असून विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनाही मोठे मताधिक्य वराड गाव देईल असा ठाम निर्धार पदाधिकारी ग्रामस्थ यांनी व्यक्त केला.
तर काळसे गावातही खा. नारायण राणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यां गावावर विशेष प्रेम राणे साहेब यांचे आहे. गावाच्या विकासात त्यांचे नेहमीच मोठे योगदान राहिले. निले्श राणे यांनीही गेल्या काही वर्षात सातत्याने गावागावात वाडी वस्तीवर विशेष लक्ष दिले. जनतेचे प्रश्न जाणून घेत ते सोडवले. त्यामुळे निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास गावच्या वतीने व्यक्त करण्यात आला.