आचरा जि. प. मतदार संघातून निलेश राणे यांना साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळून देणार- संतोष कोदे

आचरा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आचरा जिल्हा परिषद मतदार संघात विकासात्मक कामे केली जात आहेत. तसेच डॉ. निलेश राणे यांनी गेली चार वर्षे वैयक्तिक कामांनवर भर देऊन आचरा विभागासह कुडाळ-मालवण मतदार संघातील शेतकरी, कामगार, मच्छीमार अशा अनेक समस्या मार्गी लावल्या आहे. कोणतेही पद नसताना शास्वत विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

आचरा जिल्हा परिषदेतील आचरा, चिंदर, त्रिंबक, बांदिवडे, कोईळ, पळसंब, वायंगणी, तळाशील, तोंडवळी गावातील वाडिवाडीतून डॉ. निलेश राणे यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून कुडाळ- मालवण मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे लोकप्रिय उमेदवार म्हणून त्यांना पसंती मिळत आहे. म्हणूनच गतिमान विकासाची कास धरून चालणाऱ्या डॉ. निलेश राणे यांना आचरा जिल्हा परिषद मतदार संघातून साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळूवून देणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संतोष कोदे यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!