निलेश राणे यांना एकतर्फी मतदान करणार..!

चिंदर सडेवाडी-गोसावीवाडी ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण महायुतीचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना गावोगावी उत्स्फूर्त पाठीबां मिळत आहे. चिंदर सडेवाडी-गोसावीमठ येथे संपन्न झालेल्या बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून व भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या पुढाकारातून आपल्या वाडीसह गावात कोट्यावधीची विकासात्मक कामे मंजूर आणि चालू असून गतिमान विकासासाठी आपण डॉ. निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार असल्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी यावेळी घेतला. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी यावेळी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, मालवण शहर प्रभारी संतोष गांवकर, भाजप ओबीसी जिल्हा सचिव प्रकाश मेस्त्री, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, सूर्यकांत गोसावी, अण्णा गोसावी, जयेश गोसावी, मोरेश्वर गोसावी, संजय लोके, संतोष गोसावी, नितीन गोलतकर, रवींद्र गोसावी, भूषण गोसावी आदी बहूसंख्य ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

error: Content is protected !!