सर्व मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे- कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बुधवार दि.२० नोव्हेंबर,२०२४ रोजी सर्वत्र मतदान होणार आहे. या राष्ट्रीय प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या हक्काबरोबर मतदान कर्तव्य प्रक्रियेत सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाच्या बरोबरीने मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शालेय क्रिडांगणावर मानवी प्रतिकृतीच्या माध्यमातून मतदान करा. अशा आशयाचा संदेश नव मतदारांसह इतर मतदारांना देण्याचा प्रयत्न केला.मतदान या मुलभूत हक्कापासूनकोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी देखील दक्ष राहून आपल्या सर्व नातेवाईकांना व परिसरातील नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे, वृद्धांना मतदान कक्षापर्यंत नेण्यास सहाय्यक करावे व या राष्ट्रीय कर्तव्यास हातभार लावावा असे मत व्यक्त केले तसेच सर्व सजग मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून या लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे. सुदृढ राष्ट्र व समृद्ध लोकशाही घडवण्याकरिता आपल्या हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून सर्वांनी जागृत राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. जिल्ह्यातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला व दहशतवादाला बळी न पडता सर्व निवडणूक शासकीय यंत्रणेला प्रतिसाद देऊन बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत घराबाहेर पडून हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे सर्व मतदार बंधू व भगिनींनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यावेळी केले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.एस.मरळकर, क्रिडा शिक्षक एस.टी.तुळसणकर यांच्या सह प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.











