वैभव नाईक यांना मोठया मताधिक्क्याने निवडून आणणार – अनुष्का गांवकर यांचा विश्वास
आचरा (प्रतिनिधी) : आचरा ग्रामपंचायत सदस्य तसेच आचरा उबाठा महिला विभाग प्रमुख अनुष्का प्रशांत गांवकर यांनी गाऊडवाडी येथील संभादेवी मंदिरात साकडे घालून कुडाळ – मालवण मतदार संघांचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांची निशाणी मशाल घेऊन आचरा वोर्ड क्र. 3 गाऊडवाडी प्रभागात कार्यकर्त्यांनसह घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला.
आचरा गाव म्हणजे शिवसेना उबाठा गटाचा बालेकिल्ला आहे. गावात वैभव नाईक यांनी कोटीची विकासात्मक कामे पूर्णत्वास नेली आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्या सारखे त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. समाजाभीमुख काम करणाऱ्या व्यक्तीजवळ जेवढी आत्मीयता, धमक, संयम लागतो तो वैभव नाईक यांच्याकडे आहे. याच जोरावर वैभव नाईक यांना आम्ही आचार्यातून मोठया मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास प्रचार सांगतेच्या दिवशी आचरा ग्रामपंचायत सदस्य त था आचरा उबाठा महिला विभाग प्रमुख अनुष्का प्रशांत गांवकर यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी जगदीश पांगे, अनंत पांगे, सुंदर आचरेकर, जहीब काझी, राजु काझी, मयुर गांवकर, गणेश पांगे, प्रशांत गांवकर, ज्योती पांगे, शुभांगी पांगे, उर्मिला पांगे, सत्यवान पांगे, दिलीप पांगे, शाईन काझी, इमू मुजावर, सुवर्णलता पांगे, तुकाराम पांगे, नबीला नाईक आदी उपस्थित होते.













