नाधवडे धनगरवाडीत घरासमाेर उभी केलेली मोटार सायकल चाेरीस

वैभववाडी (प्रतिनीधी) : नाधवडे धनगरवाडी येथील राजेश कानू बोडेकर यांची घरासमोर लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेली आहे. ही घटना दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत त्यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत तक्रार दिली आहे.

बोडेकर व त्यांची पत्नी सकाळी त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या चरण्यासाठी रानात घेऊन गेले होते. सायंकाळी 4 वाजता त्यांचा मुलगा घरी आला. तेव्हा त्याला घरासमोर लावलेली मोटार सायकल दिसली नाही. आई वडील घरी आल्यानंतर त्याने ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर सोमवारी रात्री उशिरा चोरीची तक्रार देण्यात आली. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

error: Content is protected !!