राणे परिवाराचा एकनिष्ठ शिलेदार सोनू सावंत यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल – संदीप साटम

सामाजिक उपक्रमांनी सोनू सावंत यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान शिबिरात 175 रक्तदात्यांनी केले रक्तदान ; हळदीकुंकू समारंभाने महिलावर्ग खुश

शैक्षणिक साहित्य मिळताच विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले

कणकवली (प्रतिनिधी) : सोनू सावंत यांचा वाढदिवस मागील 14 वर्षे त्यांचा मित्रपरिवार सामाजिक उपक्रमांनी साजरा करत आहे.सेवाभावी उपक्रमांनी सातत्यपूर्ण आपला वाढदिवस साजरा करणे सोपे नाही.समाजकार्यात सोनू यांनी आपला अमिट ठसा निर्माण केला.राणे कुटुंबीयांचा एकनिष्ठ शिलेदार असलेल्या सोनू सावंत यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम म्हणाले. भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वरवडे येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी साटम बोलत होते. दीपप्रज्वलन भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोनू सावंत यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.

यावेळी सोनू सावंत यांच्या पत्नी माजी पं स सदस्या राधिका सावंत, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे,देवगड माजी सभापती रवी पाळेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर,आशिये सरपंच महेश गुरव, कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर,वरवडे उपसरपंच अमोल बोंद्रे, महेश सावंत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेखर राणे,भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत,भाई परब, संतोष चव्हाण, ऍड. अभिजीत सावंत, संतोष पुजारे, सुशील सावंत, विजय घाडीगांवकर, सादिक कुडाळकर, हेमंत सावंत, विजय कोदे,संदीप राणे,दशरथ घाडीगांवकर, हनुमंत बॉंद्रे, विजय कदम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष महेश कदम, ग्रा पं सदस्य प्रदीप घाडीगांवकर, विशाल कासले,अनुश्री परब नूरजहाँ खोत, अंकिता घाडीगांवकर, अनिल घाडीगांवकर, सचिन घाडीगांवकर, केतन घाडीगांवकर, दिनेश अपराज, संदीप घाडीगांवकर, सुनील परब, राजू परब, रियाज खान, हनिफ शेख, आजीम कुडाळकर, सलाउद्दीन कुडाळकर, सदा चव्हाण, संजय सावंत, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, संतोष शेट्ये, किरण सावंत सुयोग सावंत निलेश सावंत, सागर लाड ,प्रज्ञेश चव्हाण, मंगेश मेस्त्री, सिरील फर्नांडिस, जासिंत लोबो, प्रकाश फर्नांडिस, बापू सावंत, राजू कोदे प्रमोद गावडे, अमित जाधव, सागर जाधव ,प्रशांत देसाई, निलेश देसाई, प्रशांत गावडे ,शिक्षक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांनी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सोनू सावंत म्हणाले की, माझे मित्र हीच माझी मोठी संपत्ती आहे. माझे कार्यकर्ते माझ्या वाढदिवशी एखाद्या सणा सारखा उत्सव साजरा करतात. जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये पहिल्या 3 क्रमांकाचे रक्तदान या शिबिरात होते.

माझा वाढदिवस यावर्षी खास आहे कारण वरवडे गावचे तीन सुपुत्र आज देशांत राज्यात आपल्या वरवडे गावाचे नाव गाजवत आहेत. खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि आमदार निलेश राणेंमुळे आपल्या वरवडे गावचा नावलौकिक राज्यासह देशात पोचला आहे.विजयी हॅट्ट्रिक केलेले आमदार नितेश राणे पुढील वर्षी पालकमंत्री म्हणून वाढदिवसाला येतील. सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने मागील 14 वर्षे अखंडपणे वाढदिवशी रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. पहिल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांची असलेली संख्या आता 175 अशी दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी 70 टक्केहून अधिक रक्तदाते हे कायम रक्तदाते असतात. रक्ताची कृत्रिम निर्मिती करता येत नाही. मानवी शरीरातील रक्त वगळता अन्य सर्व अवयव कृत्रिम अथवा रिप्लेस करता येतात. मात्र आपत्कालीन वेळी रक्ता ची गरज रक्त पूर्ण करू शकते. त्यामुळे सर्व रक्तदात्यांनी मोठे समाजोपयोगी काम केले आहे. यावेळी बोलताना दिलीप तळेकर म्हणाले की, दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे सोनू सावंत होय.सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करताना सोनू सावंत यांनी रक्तदान शिबिरा सारखे अनमोल काम केले आहे. जेव्हा आपत्कालीन स्थितीत रुग्णाला रक्ताची गरज भासते तेव्हा आम्हाला सोनू सावंत यांचा आधार असतो. कलमठ विभागातील युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी सोनू सावंत यांच्यासोबत आहे. त्यामुळे सोनू सावंत हे यावेळी जिल्हा परिषद मध्ये नक्की असतील. राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे म्हणाले की, बरे बोलण्यापेक्षा खरे बोलायला सोनू सावंत पसंती देतात. परखड मत मांडणारा सोनू हा जहाल मतवादी आणि दिलदार स्वभावाचा आमचा हक्काचा मित्र आहे. राणे कुटुंबियांना अपेक्षित असे सामाजिक राजकीय काम सोनू सावंत करत आहे.त्यामुळे नक्कीच सोनू सावंत यांच्या रुपात वरवडे गावाला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळेल. देवगड पं स चे माजी सभापती रवी पाळेकर म्हणाले की गरजू माणसाला नेहमीच सोनू सावंत मदतीचा हात देतात. कार्यकर्त्यांचे मोहोळ सोनू सावंत यांनी स्वकर्तृत्वाने कमावले आहे. यावेळी संदीप राणे, सुशील सावंत, भाई परब, ऍड अभिजित सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी पं स सदस्या राधिका सावंत यांच्या हस्ते उपस्थित शेकडो महिलांना ब्रँडेड कंपनी चे प्लास्टिक सूप वाटप करण्यात आले. तसेच वरवडे गावातील जिल्हा परिषदेच्या फणसवाडी, हिवाळेवाडी आणि प्राथमिक शाळा नं 1 या शाळेतील आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना सोनू सावंत यांच्याकडून स्कुल बॅग, आणि खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन आभार प्रदर्शन महेश गुरव यांनी केले.

error: Content is protected !!