ओरोस (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विभागाच्या विविध योजना व आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजावणीची पाहणी व आढावा घेणेसाठी कॉमन रिव्ह्यू मिशनची केंद्र शासनाची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात दाखल झाली आहे. भेटीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये भेटी देऊन आरोग्य कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धी बाबत पाहणी करण्यासाठी राज्य माहिती शिक्षण व संपर्क विभाग पुणेचे उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर व सहाय्यक संचालक डॉ.संजय जठार पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यात भेट दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
आरोग्याचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांची जिल्ह्याला भेट












