एस एम हायस्कुलची जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रभात फेरी

कणकवली (प्रतिनिधीं) : येथील एस. एम.हायस्कूल कणकवली या प्रशालेमार्फत जागतिक दिव्यांग समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन ३ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. समाजात अनेक दिव्यांग स्वतःचे काम स्वतः करून समाजासाठीही कार्य करत असतात त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.याच निमित्त या दिनाचे औचित्य साधून फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या फेरीमध्ये आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंपी मॅडम, उपशिक्षणाधिकारी आवटी मॅडम, कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे सचिव डी.एम.नलावडे यांनी या फेरीला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या फेरीमध्ये मुख्याध्यापक जी. एन. बोडके,पंचायत समिती कणकवलीचे विशेष शिक्षक भाऊसाहेब कापसे, प्रणाली सावंत, कमलेश कामतेकर, नितेश तेली, सचिन सर्पे,एस.एम्.प्रशालेचे सहायक शिक्षक सी.डी.हिर्लेकर,ए.ए.महिते, एम.एस.गुरव सहभागी झाले होते.

error: Content is protected !!