संस्था सचिव नलावडेंच्या हस्ते उदघाटन
कणकवली (प्रतिनिधीं) : एस. एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे एस,एम. प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रशालेमध्ये दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. मंगळवार दि. 03 डिसेंबर 2024 रोजी आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे सचिव डी एम. नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या प्रदर्शनासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी उपशिक्षणाधिकारी श्रीमती आवटी आणि कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी. एम. नलावडे यांनी या प्रदर्शनाला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाचे नियोजन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका एस.एस.तावडे यांनी केले होते.















