खारेपाटण हायस्कूल येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधीं) : ज्ञानवर्धिनी नर्सिंग इन्स्टिट्यूट तळेरे यांच्या माध्यमातून शेठ न.म.विद्यालय खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे जागतिक एड्स दिनानिमित्त ‘ एड्स जनजागृती शिबिर ‘नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी ज्ञानवर्धिनी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक जयेश मोचेमाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून एड्स या विषयावर पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांमध्ये एड्स बद्दल जनजागृती निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मनातील एड्स आजाराबद्दलच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या ज्ञानवर्धिनी नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे प्रशालेचे प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी स्वागत केले. ज्ञानवर्धिनी नर्सिंग इन्स्टिट्यूट च्या या अभिनव उपक्रमाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, व सर्व संचालक मंडळ यांनी विशेष आभार व्यक्त केले.


error: Content is protected !!