महाराष्ट्र राज्यव्यापी लॅबोरेटरी धारक संघटना अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर, महाराष्ट्र राज्य सचिव पदी रमेश चौगले यांची बिनविराेध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ऐनालिस्ट अँड प्रॅक्टिसनर (ACLAP) ( अक्लाप) या महाराष्ट्र राज्यव्यापी लॅबोरेटरी धारकांच्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी वैभववाडी येथील प्रशांत गुळेकर यांची तर महाराष्ट्र राज्य सचिव पदी इचलकरंजी कोल्हापूर येथील रमेश चौगले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

अक्लाप या संघटनेची शिर्डी येथे ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठकीत ही निवड सर्वानुमते बिन विरोध पार पडली.उपाध्यक्ष पदी गणेश बोंधारे (नांदेड), खजिनदार पदी उमेशचंद्र सोनार (नंदुरबार) तर सहसचिव पदी राजेश गरुड (परभणी) यांची निवड झाली.

कै.अण्णासाहेब करोले यांनी स्थापन केलेल्या अक्लाप ही राज्यव्यापी संघटना संपूर्ण महाराष्ट्रात लॅब धारकांच्या न्याय हक्कांसाठी लढत असलेली सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेची संपूर्ण महाराष्ट्रातून नुकतीच २१ जिल्हा अध्यक्ष ची राज्य कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली होती. नूतन कार्यकारिणी बैठक शिर्डी येथे पार पडली त्यात २१ राज्य प्रतिनिधीनी वरील निवडी बिन विरोध केल्या. नूतन पदाधिकाऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील लॅब धारकांतून कौतुक होत आहे.

अक्लाप संघटनेच्या पदाधिकारी निवडीत कोकण विभागाला प्रथमच स्थान मिळाले असून प्रशांत गुळेकर हे राज्याध्यक्ष झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे.या निवडी साठी धनंजय डबीर (नाशिक),कुमार पाटील (अहिल्या नगर), रघुनाथ भोंगळे (पुणे),अनिल राठी (संगमनेर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

error: Content is protected !!