वैभववाडी (प्रतिनिधी) : ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी निवासी कॅम्प जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला. या १० दिवसीय निवासी कॅम्प मध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले सुत्रसंचलन मध्ये वैष्णवी विश्वनाथ चव्हाण हिने प्रथम क्रमांक तर शिवानी रत्नाकर फुटक हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चंदना परशुराम गुरव हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या निवासी शिबिरात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधून २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धकांना कर्नल दिपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे, थर्ड ऑफिसर संदेश तुळसणकर, शोभा गावडे यांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.निवासी कॅम्पमध्ये अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश












