मुंबईहून गाडीचा क्लीनर म्हणून गेलेला युवक कुडाळमधे पोलीसांना मिळून आला निराधार
खारेपाटण (प्रतीनिधी) : मुंबईहून गाडीचा क्लीनर म्हणून गेलेला मुकेश जयेश सिंग हा मनोरूग्ण बौध्दिकदृष्ट्या देखील चँलेंज्ड असलेला युवक निराधार आणि बेघर स्थीतीत कुडाळ पोलीसांना झाराप येथील आराध्या हाँटेल येथे नुकताच मिळून आला. कुडाळ पोलीसांनी दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांच्याशी संपर्क साधून या युवकाला सुरक्षेकामी आणि देखभालीसाठी पणदूर संविता आश्रमात दाखल करण्यात आले होते. दि. २/१२/२०२४ रोजी या युवकाचे भाऊ प्रविण जयेश सिंग रा. कैलासनगर, कोकणीपाडा, दहिसर पुर्व मुंबई यांनी प्रथम कुडाळ पोलीस ठाणे येथे पोलीस व्हेरिफिकेशन प्रक्रीया पूर्ण करून व पुढे संविता आश्रमात येवून भाऊ मुकेश यास ताब्यात घेतले. तर संविता आश्रमातील सेवा कार्यकर्त्यांनी मुकेश जयेश सिंग याची आश्रमातील वास्तव्यात काळजी घेतल्याबद्दल सिंग कुटुंबियांनी आश्रमातील सर्वांचे आभार मानले.