बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी यासाठी ऊबाठा सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, माजी आ .राजन तेली, सुशांत नाईक, बाबुराव धुरी, अवधूत मालणकर, छोटू पारकर, नागेश ओरस्कर, हरी खोबरेकर, राजन नाईक, जान्हवी सावंत, मंदार शिरसाट यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. हि बाब अत्यंत दुःखदायक असून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी असे निवेदन दिले आहे.