डामरे गावचे आदर्श काम ; होळीत चव्हाट्यावर भरवले रक्तदान शिबिर

सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : डामरे ग्रामस्थ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डामरे चव्हाटा येथे ५ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डामरे ग्रामस्थांच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. हे रक्तदान यशस्वी होण्यासाठी सरपंच किरण कानडे, उपसरपंच संतोष मेजारी, अभिषेक सावंत , सागर साटम,विनायक पारधिये, चंद्रहास ऊर्फ बबलू सावंत, पोलीस पाटील विश्वास सावंत,स्वप्नील सावंत,दिपक सावंत व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

error: Content is protected !!