गंभीर दुखापत प्रकरणी वैभव मालंडकर, रीमेश चव्हाण सह अनोळखी युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : डोक्यावर दगड मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी वैभव मालंडकर ( वय ३२, रा.कणकवली- कांबळेगल्ली), रीमेश चव्हाण ( वय ३५, रा. कलमठ बिडयेवाडी) यांच्यासह एका २५ वर्षीय अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी प्रकाश शामराव शिंदे (39 कणकवली बांधकरवाडी) यांच्या फिर्यादीवरून तिघांवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव मालंडकर , रीमेश चव्हाण यांच्यासह एका २५ वर्षीय अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वा.च्या सुमारास घडली.
प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता रीमेश चव्हाण यांनी मला अन्नपूर्णा बियर बार येथे बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत वैभव मालंडकर व अन्य एक जण होता. त्यानंतर रीमेश चव्हाण व वैभव मालंडकर यांनी मला शिवीगाळ करत शर्टाला पकडले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने माझ्या डोक्याच्या पाठीमागे दगड मारला. तसेच परत अशा भानगडी केल्यास तर तुला ठार मारू अशी धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सुपल करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!