परभणी तील घटनेचा सिंधुदुर्ग भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून निषेध

जिल्हाधिकारी, एसपी याना दिले निवेदन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती च्या प्रतीची मंगळवारी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या व्यक्तीने विटंबना केली.या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभारत उमटत आहे. ही घटना निंदनीय आहे याचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेचा जलद गतीने तपास करून दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणी मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचेकडे निवेदन देऊन करणेत आली आहे.तसेच हा संविधानाचा केलेला अवमान आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा (भा. ज. पा.) च्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करणेत आला. यावेळी भाजप सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव सिंधुदुर्ग भाजप चे जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव व अनुसूचित जाती मोर्चा चे सर्व जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!