फोंडाघाट (प्रतिनिधी) : सुमारे ११४ वर्षाचे प्राचीन, निसर्गरम्य,अभूतपूर्व परिसरात उंच टेकडीवर आध्यात्मिक वारसा लाभलेल्या दत्तमंदिरामध्ये उद्या तारीख १४ डिसेंबर – शनिवारी सायंकाळी सहा वाजता जन्मोत्सव पार पडणार आहे. यानिमित्ताने दशक्रोशीतील छोटे व्यावसायिक,खाद्यपदार्थ, व्यापारी, हॉटेलधारक आपली छोटी छोटी दुकाने घेऊन येतात. त्यामुळे या सोहळ्यास जत्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त होते.
सकाळी दत्ताभिषेक, पुजाअर्चा, सायंकाळी पाच वाजता – सुश्राव्य भजन,सहा वाजता- दत्त जन्म, रात्री आठ ते बारा- स्थानिक भजने, रात्री बारा वाजता – ढोल ताशांच्या गजरात पालखी प्रदक्षिणा आणि त्यानंतर बुवा संतोष मिराशी ( पावणादेवी भजन मंडळ तोंडवली ) आणि बुवा उदय पारकर (दत्तगुरु भजन मंडळ, कासार्डे ) यांचे मध्ये २० × २० डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे.
या जत्रोत्सवास सर्व भाविकांनी उपस्थित राहून सोहळा यशस्वी करण्यास सहकार्य करावे,असे आवाहन श्री गुरुदत्त मंदिर सेवा मंडळ फोंडा- गडगेसखल या आयोजकांनी केले आहे…