आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत आणि निर्भया बहुउद्देशिय सेवाभावी संस्था बसरेवाडी मोफत आरोग्य शिबिर चिंदर ग्रामपंचायतिच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सकाळी सुरुवात झाली. मान्यवरच्या हस्ते शिबीराचे उदघाट्न करण्यात आले. नागरिकांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, माजी सभापती हिमाली अमरे, आचरा प्राथमिक वैद्यकीय अधिकारी कपिल मेस्त्री, डॉ. सचिन सुतार, डॉ. स्वाती जोगल, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, स्वरा चिंदरकर, चिन्मयी पाताडे, भाई तावडे, संतोष अपराज, विवेक घाडगे, गोटया अपराज आदी उपस्थित होते.