नामदार नितेश राणेंचे बंड्या नारकर, दिलीप तळेकर, उत्तम बिर्जे यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी निवड होताच भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, कणकवली ग्रामीण तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, भाजपा युवा मोर्चा पडेल मंडल तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी थेट नागपूर येथे नामदार नितेश राणे यांची भेट घेत अभिनंदन केले. आमदार नीतेश राणे यांच्या मंत्रीपदामुळे आम्हा कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवविकासाची गंगा सुरू होईल असा विश्वास नारकर तळेकर बिर्जे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!