खारेपाटण बाजारपेठेत आमदार नितेश राणे यांचे लागलेले बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे

पालकमंत्री म्हणून दिलेल्या शुभेछा खऱ्या ठरत आहेत

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे कोकणातील एकमेव भजपा उमेदवार आमदार नितेश राणे हे प्रचंड मतांनी आमदारकीची हॅट्रिक साधत विजयी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी एक मोठा बॅनर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार आमदार नितेश राणे…अभिनंदन ! या आशयाचे बॅनर खारेपाटण बाजारपेठ एस टी बस स्थानक येथे लावण्यात आला. हा बॅनर सद्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असून आमदार नितेश राणे यांना दिलेल्या पालकमंत्री म्हणून दिलेल्या शुभेछा आज खऱ्या ठरत आहेत.

राज्यात विधानसभा निवडणूक पार पाडून महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले.मात्र मंत्रिमंडळ शपथ विधी न झाल्याने सर्वच आमदार मध्ये कोणाला मंत्रीपद मिळणार याचीच चर्चा व धाकधुक होती. मात्र खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीं संकेत शेट्ये यांनी सुमारे २२ दिवसापूर्वी खारेपाटण येथे लावलेला आमदार नितेश राणे यांचा फोटो बॅनर व त्यावरील मजकूर सगळ्यांचा लक्ष वेधून तर घेत आहेच,परंतु आज राज्य मंत्रिमंडळाचा शपथ विधी सोहळा होत आहे.आणि त्यामध्ये आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खारेपाटणसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.प्रत्येकजण आता फक्त त्या क्षणांची वाट पाहत आहे.

error: Content is protected !!