खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित ५२वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल फोंडा या ठिकाणी नुकतेच संपन्न झाले.या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शेठ न. म. विद्यालय व उद्योगश्री प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज खारेपाटण मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच शाळेच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात मेहविश मुल्ला आणि पल्लवी माने या दोन विद्यार्थिनीनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले तर माध्यमिक गटामध्ये निबंध स्पर्धेत उकबा काझी,वक्तृत्व स्पर्धेमध्ये दुर्वेश नानिवडेकर,विज्ञान प्रतिकृती मध्ये विनायक पांचाळ या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेमध्ये रेवन राऊळ व प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये अभिनव हरयाण व रेवन राऊळ या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धेसाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षकानी विशेष असे परिश्रम घेतले.तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे,सेक्रेटरी महेश कोळसुलकर,सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत, प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.












