हॅन्डिकॅप अर्न ॲन्ड लर्न हेल्थ ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने वैभववाडीत शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

जास्तीत जास्त विद्यार्थी तालुका शिक्षण संस्थेच्या शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत – अवधूत रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : हॅन्डिकॅप अर्न ॲन्ड लर्न हेल्थ ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने ट्रस्टी अवधूत रावराणे यांच्या माध्यमातून दरवर्षी वैभववाडी तालुक्यातील शाळांमध्ये गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते आज वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील जवळपास ५० ते ६० विद्यार्थ्यांना वह्या व शालेय उपयोग साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्याविना शिक्षणापासून वंचित राहू नये या प्रमुख हेतूने दरवर्षी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी  हे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्न करावेत पुढील वर्षी या ही पेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येईल असे मत हेल्थ ट्रस्ट चे अवधूत रावराणे यांनी व्यक्त केले.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, हॅन्डिकॅप अर्न ॲन्ड लर्न हेल्थ ट्रस्ट मुंबई चे ट्रस्टी अवधूत रावराणे, मिनाक्षी आमटे, अनिता पाटील व‌ इतर ट्रस्ट चे सहकारी,  प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!