साटेली येथे तिलारीच्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी पडून महिलेचा मृत्य

दोडामार्ग (प्रतिनिधी) : गुरुवारी पहाटे साटेली भेडशी भोमवाडी येथे तिलारीच्या उजव्या कालव्यात स्कॉर्पिओ चालकाने आई झोपलीस का? म्हणून जरा मान मागे वळविली आणि क्षणात लक्ष विचलित होऊन स्कॉर्पिओ गाडी थेट कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात शुभांगी शिवा परब, वय वर्षे 62 यांचा मृत्यू झाला. या घटनेने वझरी पेडणे गोवा तसेच कुडासे वानोशी गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला. तीन किलोमीटर अंतरावर घर असताना काळाने डाव साधला. घटनास्थळी दोडामार्ग पोलिसांनी पंचनामा केला.

दोडामार्ग तालुक्यातील कुडासे वानोशी येथे माहेर असलेल्या वझरी पेडणे गोवा येथे सासर असलेल्या शुभांगी शिवा परब या आपला मुलगा सचिन परब याला सोबत घेऊन तिचे पती कोल्हापूर येथे दवाखान्यात आहेत. त्यांना डिसचार्ज देणार म्हणून भाऊ दत्ता तळणकर यांची स्कॉर्पिओ गाडी एम.एच. 07 ए.जी. 6951 घेऊन बुधवारी सकाळी कोल्हापूर येथे गेले होते. पण डिसचार्ज मिळाला नाही म्हणून ते रात्री उशिरा कोल्हापूर येथून घरी येण्यासाठी रात्री उशिरा आई मुलगा निघाला. रात्री कुडासे वानोशी येथे भावाच्या घरी आराम करून सकाळी नंतर वझरी पेडणे गोवा येथे जाण्याचा बेत होता. कोल्हापूर प्रवास करून ही स्कॉर्पिओ गाडी वानोशी कुडासे रस्त्यावर वळवली आणखी पंधरा मिनिटात ते घरी पोहोचणार होते. जवळपास पाऊणे दोनशे किलोमीटर प्रवास यामुळे स्कॉर्पिओ गाडी चालवणारा मुलगा सचिन परब याने आई काय बोलत नाही म्हणून सहज मान मागे वळविली आणि आई झोपलीस का अशी विचारणा केली. आणि एवढ्यात तिलारी उजव्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी कधी पडली हे कळलेच नाही.

error: Content is protected !!