जागतिक महिला दिनी कलागुणांना व्यासपीठ मिळवून देऊन महिलांचा सत्कार होतो, प्रेरणा मिळते – संजना आग्रे

पाककला स्पर्धेत प्रणिता बिडये प्रथम !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आजवर महिलांना आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, प्रत्येक क्षेत्रात दुय्यम स्थान दिले गेले. मात्र आता स्त्रीसक्षमीकरण आणि महिला सबलीकरणामुळे,महिलांना पुरुषांसोबत काम करण्याची, आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी, शासनासह समाजाने स्वीकारली आहे. जागतिक महिला दिनी महिलांच्या कलागुणांना वाव देऊन, त्यांना ऊर्जा – प्रेरणा देण्याचे कार्य या मेळाव्यातून सिद्ध होणार आहे. अशा शुभेच्छा फोंडा सरपंच सौ. संजना आग्रे यांनी दिल्या. जागतिक महिलादिनी, महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मेळाव्याचा शुभारंभ मान्यवर महिलांचे उपस्थितीत दिप प्रज्वलनाने झाला. यावेळी व्यासपीठावर संजना आग्रे, तन्वी मोदी,सुजाता हळदिवे, मालती तिरोडकर, माधवी जोशी, प्रमिला सापळे, शामल म्हाडगुत ,विभावरी रासम,प्रज्ञा शिंदे, अवंती सावंत, ललिता जाधव, सायली तेली, राजश्री नानचे, प्राची धुरी,प्रीतम भोगले, स्नेहलता पांचाळ, कृषीमॅडम इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या. यावेळी काल घेतलेल्या पाककला स्पर्धेत विजयी अनुक्रमे, प्रणिता बिडये ,आसावरी हळदिवे,सुनंदा कोरगावकरची, सेजल रेवडेकर,स्मिता बिडये ,विशाखा सावंत यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व भगिनीचे मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.

यानंतर झालेल्या रंगारंग कार्यक्रमात पंचक्रोशीतील सर्व वयोगटातील महिलांनी भाग घेऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. आणि उपस्थिताची वाहवा मिळविली. यामध्ये ईशस्तवन नृत्य, गायन, वॉक शो,विविध हिंदीहा मराठी गीतावरील सोलो व ग्रुप डान्स, मिमिक्री, बाल नृत्य यांचा बहारदार समावेश होता. कार्यक्रमाचे सुसूत्रसंचालन मनीषा चव्हाण व स्वामिनी सामंत यांनी केले.वत्सला सामंत यांनी शीतपयाची तर सुरेश सावंत यांनी मोफत सभागृहाची सोय केली. यासाठी सीआरपी प्रमुख, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सर्व बचत गटातील महिला कर्मचारी वर्ग,नंदकिशोर उचले यांनी विशेष परिश्रम घेतले.तन्वी मोदी यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्याला पंचक्रोशीतील तमाम महिलांनी उपस्थित राहून आगळावेगळा आनंद लुटला

error: Content is protected !!