अंगणवाडी सेविका – मदतनीस भरती मेरीटनुसार व्हावी

वशिल्याने भरती टाळून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा

शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ची रिक्त पदे भरतीसाठी आदेश निर्गमित केल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने गावानुसार रिक्त पदे जाहिरात देऊन प्रसिद्ध केली आहे. सदर भरतीच्या जाहिराती सोबत नियम व अटी देखील प्रसिद्ध केल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये एका पेक्षा अधिक पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक उमेदवार आपलाच नंबर लागावा यासाठी राजकीय पक्षाचा किंवा कार्यालयीन ओळखीचा फायदा घेऊन आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य उमेदवाराची निवड त्याच्या गुणवत्तेनुसार, नियम व अटीशर्तीची योग्यप्रकारे अंमलबजावणी करून पात्र उमेदवारास योग्य न्याय देणे गरजेचे आहे. जिल्हाप्रशासनाने कोणत्याही पात्र उमेदवारावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही हरेश पाटील यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!