वायरमनला मारहाण प्रकरणी उंबर्डे येथील एकावर गुन्हा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वीज वाहिन्यांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्याच्या रागातून वीज वितरण कंपनीचे वायरमन महम्मदहसन हमीद पाटणकर रा.उंबर्डे महबूबनगर यांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अब्दुलरहीमान दस्तगीर रमदुल वय 38 रा. उंबर्डे महबूबनगर याच्यावर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उंबर्डे महबूबनगर येथे घडली. महम्मदहसन पाटणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 5 डिसेंबर रोजी समीर लांजेकर व अस्लमकरीम रमदुल यांनी त्यांच्या वाडीतील वीज पुरवठा बंद झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे ते व तन्वीर बोबडे हे त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता, तिथे वीज वाहिन्यावर झाडाची फांदी पडलेली होती. त्यामुळे त्या त्यांनी फांद्या तोडून विद्युत प्रवाह सुरळीत केला. झाडाच्या फांदया तोडल्याचा राग मनात धरून गुरुवारी सकाळी दहा वाजता उंबर्डे महबूबनगर येथे डीपीतील विद्युत प्रवाह बंद करीत असताना संशयित आरोपी अब्दुलरहीमान अब्दुल यांनी पाटणकर यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून रस्त्यावर खाली पाडून शिवीगाळ व हाताच्या ठोश्याने मारहाण केली. व शासकीय काम करीत असताना वायरमनला मारहाण केल्याप्रकरणी रमदुल याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!