गावडे समाज मंदिर तरंदळे-कुंदेवाडी येथे 21 राेजी श्री सत्यनारायण महापुजा

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गावडे समाज मंदिर तरंदळे, कुंदेवाडी येथे सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयाेजित करण्यात आली आहे. श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त रात्री 8 ते 10 महाप्रसाद, रात्री 10 नंतर स्थानिक मंडळांची सुस्वर भजने हाेणार आहेत. भाविक भक्तांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कुंदेदेव, गावडे समाज मंडळ, तरंदळे कुंदेवाडी आणि श्री कुंदेदेव गावडे समाज मित्र मंडळ, मुंबई यांनी केले आहे.

error: Content is protected !!