कोल्हापूर, कळंबा येथे दि २९ डिसेंबर २०२४ रोजी मेळाव्याचे उद्घघाटन
खारेपाटण (प्रतिनिधी) : संत रोहिदास अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने चर्मकार समाजाचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा भव्य राज्यस्तरीय वधु – वर पालक परिचय मेळावा रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० या वेळात जय पॅलेस मंगल कार्यालय कोल्हापूर – गारगोटी रोड झाडाच्या गणपती जवळ, कळंबा,ता.करवीर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या वधु – वर परिचय मेळाव्याला महाराष्ट्र,कर्नाटक व गोवा या तीन राज्यातील वधु – वर व आपल्या पालकांना समवेत हजर राहणार आहेत.ज्या नव वधु – वर यांना या मेळाव्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मेळाव्यात येताना आपला स्वतःचा फोटो व बायोडाटा घेऊन येणे. याबरोबरच कार्यक्रमास १ तास अगोदर येऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच या मेळाव्याकरीता प्रवेश फी ५००/- रुपये ठेवण्यात आली आहे.
या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी सहदेव कोंडविलकर – ९४२१९४९७३३, रघुनाथ मोरे – ९८९०८५८३३२,९९७५८६७८०२, विठ्ठल नांगरे – ९५७९६२९०२०, यांचेशी संपर्क साधावा. तरी राज्यातील चर्मकार समाज बांधवानी तथा नवीन वधु – वर,घटस्फोटित, विदुर व बीजवर इत्यादींनी या वधु – वर मेळाव्याचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य कोकण विभाग प्रमुख सहदेव कोंडविलकर यांनी केले आहे.













