मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या आश्वासन
नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत प्रकल्प कृती समितीने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट
कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे महमदवाडी मध्यम धरण पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत भाजप पुरस्कृत नरडवे महमदवाडी धरणग्रस्त प्रकल्प कृती समितीने मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. आपला विविध मागण्यासंदर्भात यावेळी निवेदनही दिले. दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी या धरण प्रकल्पाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. नरडवे महमदवाडी प्रकल्पाची साडेसहा मी उंची वाढ ही आपल्या माध्यमातूनच केली गेली असल्यामुळे पहिल्या मुळ प्रस्तावामध्ये फक्त 29 जण पर्यायी शेत जमिन साठी पात्र होते. त्यानंतर साडे सहा मी उंची वाढ केल्यामुळे 299 खातेदार हे पर्यायी जमिन अथवा आर्थिक पॅकेज संज्ञेत बसू शकले हे केवळ मात्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्यामुळे शक्य झाले आहे.
पर्यायी शेतजमीन ऐवजी विशेष आर्थिक पॅकेज वाटप होणेबाबत.नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी ऐवजी शासनाने जाहीर केलेले विशेष आर्थिक पॅकेज, हेक्टरी रु. 50 लक्ष देण्याचे 299 खातेदारांना रक्कम रु 63 कोटी 74 लाख रु दिनांक 8/09/2022 रोजी मंजूर होवून जिल्हा प्रशासनाकडे जमा असून सुद्धा अद्याप प्रकल्प ग्रस्त खातेदारांना वाटप करण्यात आलेले नाही. अशा विविध मागण्याचे निवेदन मंत्री नितेश राणे यांना दिले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह सुरेश ढवळ लक्ष्मण ढवळ संजय पवार संजय सावंत ऑल फ्रेंड डिसोजा रवींद्र पालव यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.












