सुप्रसिद्ध नृत्यांगना कु.दिक्षा प्रमोद नाईक “विशेष कर्तृत्व पुरस्काराने” सन्मानीत

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना कु.दिक्षा प्रमोद नाईक हिला मुंबई दादर येथे पार पडलेल्या गौड ब्राम्हण सभा यांच्या वतीने नृत्य क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्टकामगिरीबद्दल “विशेष कर्तृत्व पुरस्कार“ हा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्तिथीत देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गौड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष जगदीश वालावलकर, कार्याध्यक्ष, रमेश झारापकर, विकास मोतीराम शेठ देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या सोहळ्यासाठी दिक्षाची आई कृपा नाईक, वडील प्रमोद नाईक व नातेवाईक स्वप्निल सामंत, स्वप्नाली सामंत, योजना सामंत हे सुद्धा उपस्थित होते. दिक्षा नाईक ही कुडाळची शासनमान्य संस्था चिमणी पाखरं या ठिकाणी नृत्याचे शिक्षण घेत असून कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेत 11 वी मध्ये शिकत आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिला हा पुरस्कार मिळाला असून नृत्य क्षेत्रासाठी मिळालेला हा तिचा पहिला पुरस्कार आहे. दिक्षा हिने वयाच्या 6 व्या वर्षांपासन आत्तापर्यंत नृत्य स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा आपल्या नावावर केलेल्या आहेत. हल्लीच फुलवंती या रील्स वरती केलेल्या नृत्यासाठी दिक्षा हिला अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी टॉप 5 मध्ये तिची निवड करून पुणे येथे फुलवंती सिनेमाच्या पहिल्या प्रीमियर साठी दिक्षाला विजेती म्हणून विशेष आमंत्रण दिलं होत. दिक्षा हिने कोल्हापूर गोवा रत्नागिरी चिपळूण सिंधुदुर्ग अश्या बऱ्याच ठिकाणी डान्स शो सादर करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. सोबतच ती स्वतः होतकरू मुलांसाठी “डान्स विथ दिक्षा“ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन नृत्याच मोफत शिक्षण देत आहे. तिच्या या नृत्य क्षेत्रातील उत्तुंग यशामध्ये तिचे आईवडील, नृत्य मार्गदर्शक रवि कुडाळकर, नातेवाईक, खानोलकर तसेच संपूर्ण गौड ब्राह्मण परिवार यांचा मोलाचा वाटा आहे. या पुरस्कारासाठी दिक्षा हीच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!