सर्वांकडून राज्य स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!!
फोंडाघाट (प्रतिनिधी) : 51 वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी कासार्डे या ठिकाणी झाली. या मध्ये आपल्या आझाद ज्यूदो असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. -35 किलो वजनी गटात = जय प्रसाद देसाई (प्रथम क्रमांक), -40 किलो वजनी गटात = दुर्वांक दीपेश नातू (प्रथम क्रमांक), -44 किलो वजनी गटात = ऋतुजा रुपेश चव्हाण (प्रथम क्रमांक), +57 किलोवर वजनी गटात = यशदा अनिल भोगले (प्रथम क्रमांक).
या विद्यार्थ्यांची 4, 5, 6 जानेवारी 2025 पुणे ( बालेवाडी, म्हाळुंगे ) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यांना अजिंक्य पोफळे, संभाजी पाचंगे यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. निवड झाल्याचे वृत्त समजताच आझाद ज्युदो असोसिएशन चे संचालक आणि क्रीडा प्रेमी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.












