आमडोस श्री देव रवळनाथ पंचायतन सोमवारी निघणार तीर्थस्नानाला

सोमवती अमावस्या तीर्थस्थानचा योग

चौके (प्रतिनिधी) : येत्या सोमवारी सोमवती अमावस्येचा योग असल्याने मालवण तालुक्यातील आमडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन सर्व देवतांचे तरंग पालखी लवाजम्यासह सोमवारी सकाळी वाजत गाजत मालवण येथील तीर्थक्षेत्र मोरयाचा धोंडा येथे प्रस्थान करणार आहे.

यावेळी सकाळी सात वाजता रवळनाथ मंदिरा मधून सर्व देवता पालखी सहित प्रस्थान केल्यावर नांदरुख गावचे ग्रामदैवत श्री देव गिरोबा ची भेट घेऊन आनंदव्हाळ कुंभारमाठ मार्गे देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिर येथे परंपरेनुसार विश्रांती घेतल्यानंतर देवाचा पारंपारिक मार्ग गाड पानंद मार्गावरून गावकरवाडी मार्गाने तीर्थक्षेत्र मोरयाचा धोंडा येथे तीर्थ स्नानासाठी जातील त्याठिकाणी प्रथम गणेश पूजन करून देव तरंगा सहित पवित्र तीर्थस्नान करतील त्यानंतर भावी ग्रामस्थ तीर्थस्थान झाल्यानंतर त्याच मार्गाने देव देवता पुन्हा मागे प्रस्थान करतील.

यावेळी पुन्हा देऊळवाडा येथील श्री नारायण मंदिर येथे तेथील देवाला नैवेद्य दाखवून प्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन सायंकाळपर्यंत वाजत गाजत सर्व देवतांचे आमडोस रवळनाथ मंदिर येथे मुक्कामी आल्यानंतर देव देवता आपल्या राउळात पुन्हा विसावणार आहेत. तरी या सोमवती अमावस्या तीर्थ स्नानाचा व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी श्री देव रवळनाथ पंचायतन आंबडोस यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!