खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित

शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटणच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उस्ताहात संपन्न संपन्न…

“माजी विद्यार्थ्यांचे पाठबळच शाळांना गतवैभव प्राप्त करून देत असतात” – प्रा.संजय कळमकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : “ज्या शाळेतील माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन मोठ्या संख्येने एकत्र येतात.काही तरी नवीन घडव असतात. त्यामुळे अशा माजी विद्यार्थांच्या पाठबळावरच शाळांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होत असते.” असे भावपूर्ण उदगार प्रसिद्ध कवी लेखक आणि व्याख्याते प्रा.संजय कळमकर यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मडळ संचलित शेठ न.म.विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटण च्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, माजी ज्येष्ठ विद्यार्थी मिलिटरी रिटायरमेंट जवान वासुदेव जंगम, शाळेचे पाहिले विद्यार्थी अनंत पाटणकर, माजी विद्यार्थी व उद्योजक रुपेश सावंत संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव – महेश कोळसुलकर, संस्थेचे संचालक दादा कर्ले, राजेंद्र वरुणकर, संदेश धुमाळे, प्राचार्य डॉ.ए डी कांबळे, मोहन कावळे, विजय देसाई, प्रशांत गुळेकर, दिगंबर राऊत, गुरुप्रसाद शिंदे, योगेश गोडवे, सामाजिक कार्यकर्ते नंदू कोरगावकर, मंगेश गुरव, संतोष पाटणकर हायस्कूलच्या सेवा निवृत्त माजी शिक्षिका मालती कदम, स्वप्नाली कांबळे, माजी मुख्यद्यापक अकीवाटे, रानडे मॅडम, फराकटे सर, कदम सर, चौगुले सर, मठपती सर, माने सर, नवरे सर, कोंडविलकर सर, सारंग सर, कुरणे सर, शिंदे सर, राणे सर, बावदाणे सर, कळत्रे सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून व संस्थेचे संस्थापक गुरुवर्य स्वातंत्र्य सैनिक शंकरराव पेंढारकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी क्रीडा शिक्षक अत्तार व माजी विद्यार्थी वासुदेव जंगम यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी कठीण परिस्थीत संकटावर मात करत संस्थेचे शाळा चालविण्याचे काम सुरू असून याला माजी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी पाठबळ मिळत आहे.तरी या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित माजी विद्यार्थ्यांना भावनिक साद घालत शाळेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेह मेळावा निमित्त काढण्यात आलेल्या डिजिटल स्मरणीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर शाळेच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रमास मुंबई, पुणे कोल्हापूर, गोवा यांसह परदेशात असलेले काही माजी विद्यार्थी देखील उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी विद्यार्थ्यांच्या शाळा भरविण्याने तर प्रतिज्ञा व सामुदायिक प्रार्थना घेऊन करण्यात आली. तर सर्व माजी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आले. तर ज्या माजी विद्यार्थ्यानी शाळेला मदत केली अशा माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते शाळा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर या स्नेह मेळावा कार्यक्रमास उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व माजी शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना व्याख्याते संजय कळमकर म्हणाले शालेय विद्यार्थ्यानी पुस्तके वाचली पाहिजेत. आणि पुस्तकी ज्ञान बरोबरच व्यवहारिक जीवनातील शिक्षण देखील महत्वाचे आहे. आजच्या अभासी जीवनात जगायचे कसे ? असा प्रश्न उभा राहतो.कारण अभासी जगाने आपली वाट लावली आहे. तसेच मराठी भाषा विषयी बोलताना म्हणाले मराठी भाषा ही जेव्हा आपल्या पोटाची जगण्याची भाषा होईल. त्याचवेळी खर्या अर्थाने मराठी भाषेला चांगले दिवस येतील. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी विद्यार्थी वासुदेव जंगम म्हणाले “आम्ही या शाळेत विद्यार्थी दशेत असतानाच पेंढारकर सरामुळे देश सेवा व समाजसेवा करण्याचे बाळकडू आम्हाला त्यांचेकडून मिळाले आणि पेंढारकर सर यांच्या मुळेच माझ्यासारखे अनेक विद्यार्थी शिक्षणामुळे घडले.” यावेळी माजी विद्यार्थी वासुदेव जंगम यांनी १ लाख रुपयाचा धनादेश शाळेसाठी संस्थेकडे जमा केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी करून शाळेच्या आज पर्यंतच्या एकूण शैशनिक काम काजाचा शाळेच्या विकसित प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी माजी शिक्षक अत्तार सर यांनी शाळेच्या आठवणी माजी विद्यार्थ्यां समोर कथन केल्या. तसेच माजी विद्यार्थी जितेंद्र खामकर, उदय दूधवडकर, विजय केसरकर, गीता राऊत, श्रीकृष्ण बाविलकर, संतोष गांगण, सुजाता मसुरकर, रमेश जामसंडेकर, मंगेश गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या आठवणी ताज्या करत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमास शुभेछा दिल्या.तर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेचे शिक्षक महादेव मोटे यांनी करून दिला. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वारंगे यांनी शेवटी सर्वांचे आभार केले.

error: Content is protected !!