नेत्रदिपक रोषणाई,आतषबाजी,स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने देवगड बीचवर सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या जल्लोष कार्यक्रमाचा शुभारंभ फटाक्यांच्या आतषबाजीत व स्थानिक कलाकारांच्या कलाविष्काराबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने ३० आणि ३१ डिसेंबर रोजी देवगड बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी मोठ्या जल्लोषात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते पार पडले.यावेळी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनिफ मेमन,उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, सिंधुदूर्ग जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, देवगड उपनगराध्यक्षा मिताली सावंत, पोलिस निरिक्षक मनोज सोनवलकर, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष शैलेश कदम, शामराव पाटील, मधुकर नलावडे, प्रविण नळेकर, राजन कोळंबकर, सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अलोट गर्दी, नेत्रदिपक रोषणाई, आतषबाजी, स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार, अनेकविध स्टॉल आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम यांनी जल्लोष या कार्यक्रमाला सोमवारी सायंकाळपासून सुरूवात झाली.गणेशवंदनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमामध्ये खवय्यांसाठी फुडस्टॉल, लहान मुलांसाठी अनेक खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन झाल्यानंतर उद्घाटनपर स्थानिक कलाविष्कार सादर करण्यात आला त्यानंतर मान्यवर कलाकारांचा सहभाग असलेला बेधुंद हा आर्केस्टड्ढा व qसधु संकल्प कुडाळचे डान्स परफॉर्मन्स हे कार्यक्रम संपन्न झाले.कार्यक्रमासाठी देवगड बीचवर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.देवगड पोलिसांनीही वाहतुकीचे चांगले नियोजन केले होते.सुत्रसंचालन ऋत्विक धुरी तर आभार दयाळ गावकर यांनी मानले.












