नाधवडेत भरवस्तीत बिबट्याचा वावर ; ग्रामस्थ भितीखाली

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात अनेक गावातून बिबट्यांचा धुमाकूळ घातला असून त्याचा मुक्त संचार सुरु आहे.नुकताच नाधवडे गांगेश्वर मंदिरानजीक भर वस्तीत नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरावर बिबट्या बिनधास्तपणे भिंतीवर बसलेला ग्रामस्थांनी पहिला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत आहे. या परिसरात सायंकाळी अधून मधून बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबटयाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाधवडे येथील श्री. कुडतडकर हे नवीन दुमजली घर बांधत आहे. सध्या भिंतीचे काम सुरु आहे. चार दिवसापूर्वी सायंकाळी घराच्या जिन्याने वरच्या मजल्यावर जात भिंतीवर बिबट्या बसलेला नागरिकांना दिसून आला. नागरिकांनी बिबट्याचा व्हिडीओ सुद्धा काढला आहे. नागरिकांनाचा आवाज एकूण त्याने पळ काढला. त्यानंतर अधून मधून नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भित्तीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाला नागरिकांनी माहिती आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.तर गेल्या रात्री कोळपे येथील एका शेतकऱ्याची बकरी बिबट्याने फस्त केली आहे.तालुक्यातील वेंगसर, मांगवली, आखवणे भोम पुनर्वसन, उंबर्डे, तिरवडे, भुईबावडा, ऐनारी, हेत, मौदे सह अनेक गावात बिबट्याचा संचार सुरु आहे.

error: Content is protected !!